गावाविषयी माहिती
गावाविषयी माहिती
वैतरणा नदीच्या काठावर बसलेले बालीवली व कळंभोली ही दोन गावे आहेत. हि दोन गावे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील प्रगतशील व ऐतिहासिक गावे आहेत.
बालिवली व कळंभोली गावात हनुमानाची मंदिरे आहेत ही मंदिरे गावांची धार्मिक केंद्रबिंदू आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार या दोन गावांची लोकसंख्या सुमारे ६६२ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ , अंगणवाडी केंद्रे २ व सभामंडप-२ अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत बालिवली – कळंभोली चे ग्रामस्थ पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, व भाजीपाला लागवड ही प्रमुख पिके घेतली जातात.
बालिवली – कळंभोली ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नांदणी.गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ६ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
बालिवली – कळंभोली ही दोन गावे गाव आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गावे म्हणून ओळखली जातात.
भौगोलिक स्थान
बालिवली- कळंभोली ही गावे वाडा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ८ कि.मी., ८.५ कि.मी. अंतरावर वसलेले आहेत. बालिवली व कळंभोली गावांची एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ – हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण १९५ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ६६२ आहे. त्यामध्ये ३५२ पुरुष व ३१० महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने चारही बाजूला डोंगर असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगत बाणगंगा असून ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४२°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात २५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ८० ते ९० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
नांदणी.भात शेती प्रामुख्याने केली जाते.
लोकजीवन
बालिवली व कळंभोली गावांचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय भात शेती व हंगामी भाजीपाला पिके काही प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह शेळीपालन काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
बालिवली व कळंभोली गावांच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
लोकसंख्या
तपशील
संख्या
लोकसंख्या
६६२
पुरुष
३५२
महिला
३१०
एकुण
६६२
संस्कृती व परंपरा
बालिवली व कळंभोली गावांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
गणेशोत्सव,शिवजयंती, नवरात्र, दिवाळी, होळी,पोळा यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे बालिवली व कळंभोळी गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
नांदणी.च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
प्रेक्षणीय स्थळे:-
हनुमान मंदिर – बालिवली व कळंभोली दोन्ही गावांची मुख्य मंदिरे दोन्ही गावांच्या मध्यवर्ती भागात असलेले हि मंदिरे आहेत.
ग्रामदैवताचे मंदिर – बालिवली गावातील प्रमुख जागृत गावदेवी मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
ह.भ.प गुरुवर्य गोविंद बाबा मंदिर – बालिवली गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर आहे.
जवळची गावे
बालिवली व कळंभोली ही गावे वाडा तालुक्यातील पूर्वेस असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत. पांडवकालीन शिवमंदिर तिलसे गाव शेजारी आहे. कासघर, शिरसाड ,शेले, दाढरे, सोनाळे व कळंभे आसपासची प्रमुख गावे आहेत.